पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग !
पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल !
डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता .
गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग नगर पालिका पवनी शाळेत शिक्षक , श्रीकांत नागपूर जिल्हा कार्यालयात तहसीलदार म्हणून निवृत्त , देवाजी समाज सेवक, हॉस्टेल चे अधीक्षक , बाबाजी राज्य विद्दुत विभागात लाईनमन तांत्रिक दौलत राऊत नेटिविस्ट ! शशिकला , शेवंती , गृहिणी ! आज फक्त दोनच हयात देवाजी , दौलत !
वर्ष , दोन वर्ष च्या अंतराने आम्ही सर्व भावंडे , घर गच्चं भरलेलं . परत आजी काही वर्ष जिवंत .असे हे ११-१२ लोकांचे एकत्रित कुटुंब .वडील डोमाजी लहुजी राऊत , आजी पार्वताबाई मूळ चे माहेर पावनीचेच , गणवीर कुटुंबातील . मामा कडील मोटघरे , मेश्राम, रामटेके गाव जवळच खेड्यात सर्व नातेवाईक , येणे जाणे रोजचेच , पवनी चा मंगळवार , शनिवार बाजार दिवस ,शाळा , पोस्ट , बँक ,पंचायत समिती , माध्यमिक , उच्च शाळा , दवाखाना पावनीलाच म्हणून नातेवाईकांचे रोजचे येणे जाणे हा आमच्या घराचा नित्य पसारा . डोमाजी राऊत तांदळाचे व्यापारी ट्रक भरून माल नागपूरला घेऊन जायचे , शनिवारी , मंगळवारी बाजारात तांदळाचे मोठे दुकान आणि इतर गुजरी चे दिवशी सुद्धा बाजारात दुकान मांडून बसत . एम पी मध्ये तांदूळ ट्रक नेतानात एक दा जप्त झाला आणि तिथून उतरती सुरू झाली , मग गुळाचा व्यवसाय केला .मोठ्या दोन तीन मुलांचे लग्न आणि स्वतंत्र संसार सुरू झाले तेव्हा आमची अर्थी स्थिती बिघडली . पांडुरंग राऊत मोठाभाऊ नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून लागला पण पगार मिळेना , पाचपाच , साहसहा महिने पगार नाही हि स्थिती , त्या वेळी सर्वानी मेहनत घेतली . तेंदूच्या पानपट्टी पुड्या साठी माय जंगलात जायची , पान गठ्ठा घेऊन याऊची , ते सर्व आम्ही चवलायचे , पुडे बांधायचे , संध्यकाळी नेवून द्यायचे . या सर्व कामात मोठा भाऊ पांडुरंग , वाहिनी तरबेज . तेव्हा नेटिविस्ट ८ वीत होतो . नेटिविस्ट बी कॉम फायनल शिकत असताना १९७० साली वारले तेव्हा पासून मोठे भाऊ पांडुरंग यांची सर्व लहान भाऊ , बहीण यांचे संगोपन , शिक्षण , लग्न आदी सर्व कार्य केले .
पी डी राऊत गुरुजी म्हणून आता मोठे भाऊ पांडुरंग राऊत याना पवनी आणि शेजार पाजारच्या खेड्यातील लोक ओडखयाला लागली होती . त्याचे कारण म्हणजे नागपूर च्या मारिश कॉलेज मधून फर्स्ट इयर बीए झाल्या बरोबरच दादा ने पावनीच्या सिद्धार्थ वसतिगृहात , सेक्रेटरी , अधीक्षक म्हणून काम करणे सुरू केले होते . हे वसतिगृह समाजाने बरेच वर्षय आधी सुरू केले होते पण त्याला सरकारी मान्यता , अनुदान नव्हते . तेव्हा त्याला एकाद्या संस्थेशी संलग्न करावे किव्हा , संस्था नोंदणी करावी , रेकॉर्ड वेवस्थित ठेवावे , ऑडिट करून घ्यावे असे जिकरीचे काम होते ते न केल्या मुले , अनुदान , मान्यता मिळत नव्हती आणि म्हणून शशिक्षित तरुण पी डी राऊत गुरुजी ते करतील म्हणून स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत यांनी पी डी राऊत गुरुजी तुम्ही सेक्रेटरी व्हा , मी अधीक्षक होतो असे सांगून संस्था भारत सेवक समाज या संस्थे बरोबर सिद्धार्थ वास्तूगृह सलग केले , पी डी राऊत नि सर्व रेकॉर्ड नीट बनविला , ठेवला आणि त्या मुले वसतिगृहात मान्यता आणि अनुदान मिळाले . पुढे हे वसतिगृह विदर्भातील सर्वोत्तम वसतिगृह म्हणून ओळखले गेले . शेकडो विद्यार्थी तिथे राहून ,उच्च पदस्थ अधिकरी झाले . पुढे पी डी गुरुजी तुम्ही शिक्षक आहेत मी सेक्रेटरी होतो असा मन्साराम राऊत यांनी आग्रह धरला . पीडी राऊत गुरुजी मानधन न घेता अधीक्षक म्हणून जाम करू लागले .
शाळेतील काही गुरुजी म्हणजे मयूर , खापर्डे यांना घेऊन , पीडी राऊत गुरुजींनी नालंदा शिक्षण संस्था काढली . परत सर्व रेकॉर्ड ठेवले , हिशेब ठेवले , सेक्रेटरी म्हणून सर्व कामे केली , नालंदा हॉस्टेल काढले , सरकारी मान्यता मिळवून घेतली यातून अनेक मुले राहून शिकली , मोठी झाली . युद्धात जिंकलो तहात हरलो म्हणजे पीडी राऊत गुरुजी . मेहनत जीवापाड केली , गटबाजीत हरले . नालंदा शिक्षण संस्थेतून सक्रिय सहभाग पुढे कमी कमी केला . राऊत गुरुजी , बाणाईत गुरुजी , झोडे गुरुजी ते घनिष्ट मित्र , हे त्रिकुट शाळेत आणि गावांत प्रसिद्ध . पुढे नंदर्धने गुरुजी , तलमले गुरुजी चांगले मित्र झाले . खापरीचे रेहपाडे गुरुजी ,चिंचाळ चे रामटेके , पावनीचे मोटघरे गु रुजी, छगन भाई , दादासाहेब रायपूरकर प्रकाश कावळे , कस्तुरबा मुलींच्या हॉस्टेल साठी गुरु देव सेवा मंडळ , मोझरी चे अध्यक्ष दादासाहेव चव्हाण आणि इतर अनेक शैक्षणिक संस्था दादाच्या मार्गदर्शना साठी यायचे . संस्थेत या म्हणून विनंती करायचे , पण त्यांनी सर्वाना नकार दिला मात्र येईल त्याला योग्य मार्गदर्शन साठी दारे सोडावं उघडी ठेवली , योग्य मार्गदर्शन केले आणि म्हणूनच त्यांचा परिचय, कौटुंबीक जिव्हाळा वाढतच गेला सिद्धार्थ हॉस्टेल , नालंदा हॉस्टेल , कस्तुरबा मुलीचे हॉस्टेल च्या शेकडो मुलां बरोबरच शाळेतील हजारो मुले , पालक असा त्यांचा मोठा परिवार निर्माण झाला आत्म समाधानी आणि सन्यस्थ वृत्ती ने त्यांनी सर्व सोडून दिले कारण घरी असलेला धर्मात्मा कबीर बाबा फरीद चा वारसा ! आमच्या घरी असलेला नाग मंदार !
पुढे पीडी राऊत गुरुजी दूरस्थ शिक्षणाने बी ए झाले . भंडारा तुन बी एड केले , आई स्वरूप वाहिनी दादाने ठेवलेले पुष्पा आणि माहेरचे शांता, आरमोरी तील खापर्डे कुटुंबातील प्राथमिक शाळेत शिक्षिका झाल्या . मुल्ह्याध्यपिका झाल्या , निवृत्त झाल्या . दादा गेल्या नंतर खंबीर पणे उभ्या राहिल्या . त्यांना दोन आ अपत्ये मोठी मुलगी प्रतिभा , मुलगा सतीश . मुलगी भंडार्याच्या मेश्राम कुटुंबात आज दोन मुलांना घडवीत आहे .सतीश वारल्या मुळे आता वाहिनीच कुटुंबाचा आधार ! सतीश चा एक मुलगा , एक मुलगी आज कुटुंब वत्सल आजी आणि हयात भर सर्वांचे भले केलेली, सर्वात आदरणीय आमच्या वाहिनी यांच्या छत्र छायेत, शिक्षण घेत आहेत .
नेटिविस्ट डी डी राऊत वयाच्या १२-१३ वर्ष्या पासून हे सर्व त्यांचे मोठे बंधू पीडी राऊत गुरुजी चे कार्य पाहत होते , लोकांच्या घरी जा त्यांच्या साह्य घ्या त्यांना मासेज द्या, मिटिंग साठी बोलवून आणा , चहा , पाणी द्या हे सर्व काम नेटिविस्ट डी डी राऊतच करीत असत . तिथूनच नेटिविस्ट डी डी राऊत वर समाज सेवा , शैक्षणिक उपक्रम निर्माण करण्याची , जिद्दीने काम करण्याची प्रेरणा मिळाली . नेटिविस्ट राऊत नि केवळ पीडी राऊत आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने एम कॉम पर्यंत शिक्षण , जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर येथे घेतले , इंग्रजी , इतिहास , राज्यशास्त्र असे असंख्या विषयाचे राऊत गुरुजींनी गोळा केलेलले पसतके वाचली , पुढे मुंबई ला ऑडिटर म्हणून कामाला लागला . कल्याणला इंग्रजी मध्यम ची प्राथमिक शाळा काढली , मान्यता मिळवून घेतली , बाल गृह सुरू केले , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट स्थापन केली , नेटिव्ह पीपल्स पार्टी निर्माण केली . ह्या सर्वांच्या पाठी मागे एकच प्रेरणा आणि ती म्हणजे पीडी राऊत गुरुजी , माझे मोठं भाऊ , माझे पांडुरंग !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
Comments
Post a Comment